Raj Thackeray Ayodhya Visit | राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीमागे शरद पवार? मनसेने शेअर केले फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Tweet about Sharad Pawar
राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीमागे शरद पवार? मनसेने शेअर केले फोटो

राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीमागे शरद पवार? मनसेने शेअर केले फोटो

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित कऱण्यात आला आहे. या दौऱ्याला उत्तर प्रदेशातले खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. हा विरोध म्हणजे एक सापळा असून त्याला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्याच आरोपासंदर्भातले संकेत देणारे फोटो मनसेकडून शेअर करण्यात आले आहेत. (MNS Tweet about Sharad Pawar)

या फोटोंमध्ये राज ठाकरेंच्या (MNS Chief Raj Thackeray)अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातले खासदार बृजभूषण सिंह (Uttar Pradesh MP Brijbhushan Singh) हे राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात दिसत आहेत. मंचावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यासोबत ते बसलेले दिसत आहेत. सुप्रिया सुळेंसोबतचा त्यांचा एक फोटोही आहे. मनसे नेते सचिन मोरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. 'कुछ फोटो अच्छे भी होते है और सच्चे भी होते है', असं सूचक कॅप्शनही या फोटोंना देण्यात आलं आहे.

मनसे प्रवक्ते गजानन काळेंनीही (MNS Spokesperson Gajanan Kale) या ट्विटबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे, अशी सूचक प्रतिक्रिया गजानन काळेंनी दिली आहे. अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली जात असल्याच्या राज ठाकरेंच्या आरोपाला अधोरेखित करत ते म्हणाले की, जेव्हा शरद पवारांबद्दल केतकी चितळे बोलली तेव्हा, त्याआधी जेव्हा दिल्लीतल्या दुर्दैवी प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं, तेव्हाही राज ठाकरे सगळे मतभेद विसरून पवारांच्या बाजूला उभे राहिले. त्यांनी या गोष्टींविरोधात भूमिका घेतली. पण आता राज ठाकरेंच्या बाबतीत असं होताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात चुकीचे पायंडे पडतायत हे राज ठाकरेंचं म्हणणं अगदी बरोबर आहे.

हेही वाचा: दौऱ्यात अडकाविण्यासाठी सापळा रचला - राज ठाकरे

राज ठाकरेंनी कोणते आरोप केले होते?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत आपल्या अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीचं कारण सांगितलं आहे. भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला तीव्र विरोध केला होता. त्याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, दौऱ्याला विरोध करणं हा एक सापळा होता. विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या आरोपानंतर मनसेकडून बृजभूषण सिंह आणि शरद पवार - सुप्रिया सुळे यांचे फोटो शेअर करणं म्हणजे शरद पवारांमुळेच अयोध्या दौरा स्थगित करावा लागण्याचे संकेत देणारं आहे.

Web Title: Mns Chief Raj Thackeray Ayodhya Visit Postponed Because Of Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top