Mutual Fund Companies Suspend Fresh Investments in Gold ETFs Ahead of the Festive Season
esakal
नवी दिल्ली: देशातील सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर, अनेक मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुरुवारी (ता. १५) रात्री उशिरा नोटीस जारी करून गोल्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंडांमधील नव्या गुंतवणुकीवर स्थगिती आणली आहे. त्यामुळे, सणासुदीच्या काळात ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये नवी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना ती करता येणार नाही. सणासुदीत होणाऱ्या सोन्याच्या वाढत्या मागणीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.