Golden River : नदीत हात घातला की मिळते सोन्याची वाळू; काय आहे भारतातलं 'हे' गुपित!

या नदीच्या भागातले लोक या कणांवरच आपला उदरनिर्वाह चालवतात.
Golden River Jharkhand
Golden River JharkhandSakal

विचार करा, तुम्ही एखाद्या नदीत हात घालून त्यातली वाळू हातात घेतली. आणि त्यामध्ये सोन्याचे कण आढळून आले तर? हे काल्पनिक नाही, कोणत्या गोष्टीतला प्रसंग तर मुळीच नाही. हे खरंच होऊ शकतं आणि तेही आपल्या भारतात.

भारतात अशी एक नदी आहे जिच्यातून सोनं निघतं. चकीत झाला ना? पण हे पूर्णपणे खरं आहे. सोन्याच्या या नदीतल्या वाळूतून अनेक वर्षांपासून सोनं काढलं जात आहे. या नदीच्या परिसरातले लोक या सोन्यावरच आपला उदरनिर्वाह करतात.

ही नदी झारखंड राज्यातली आहे, या नदीचं नाव स्वर्णरेखा असं असून ही रत्नगर्भा परिसरात आहे. या नदीतून सोनं काढलं जातं. ही नदी झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या काही भागातून वाहते. काही ठिकाणी या नदीला सुबर्णरेखा असंही म्हटलं जातं.

स्वर्णरेखा नदी दक्षिण-पश्चिम वाहिनी असून नगडी गावातल्या रानी चुआ या ठिकाणाहून उगम पावते आणि बंगालच्या खाडीला जाऊन मिळते. ही नदी साधारण ४७४ किलोमीटर लांबीची आहे.

स्वर्णरेखा आणि तिची उपनदी असलेल्या करकरी या नदीमध्ये सोन्याचे कण सापडतात. सोन्याचे कण करकरी नदीतून वाहून स्वर्णरेखा नदीत पोहोचतात, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. करकरी नदी ३७ किलोमीटर लांबीची आहे.

पण या दोन्ही नद्यांमध्ये सोन्याचे कण कुठून येतात, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. झारखंडमध्ये नदीच्या परिसरात राहणारे लोक वाळूतून सोन्याला काढतात आणि जमा करतात. एक व्यक्ती महिन्यात सोन्याचे केवळ ७० ते ८० कणच जमा करू शकतात. सोन्याच्या या कणांचा आकार तांदुळाच्या दाण्याइतका असतो. इथले आदिवासी लोक पावसाचा सीझन सोडता, पूर्ण वर्षभर हे लोक हेच काम करत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com