esakal | कोरोना लस घेतल्यानंतर महिलांना सोन्याचा दागिना अन्  पुरुषांना भन्नाट गिफ्ट
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना लस घेतल्यानंतर महिलांना सोन्याचा दागिना अन्  पुरुषांना भन्नाट गिफ्ट

Coronavirus Vaccination News : लसीकरणाला चालना मिळण्यासाठी हा उपक्रम हाती घेतलाय

कोरोना लस घेतल्यानंतर महिलांना सोन्याचा दागिना अन्  पुरुषांना भन्नाट गिफ्ट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

राजकोट : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट आली असून दररोज एक लाखांच्या आसपास रुग्ण आढळत आहे. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी देशात लसीकरणाच्या मोहिमेला वेग आला आहे. तरिही अद्याप काही ठिकाणी लस घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. लसीकरणांला अद्याप वेग यावा यासाठी गुजरात येथील राजकोटमधील स्वर्णकार समाजाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. लसीकरणाच्या कॅम्पमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या खास भेटवस्तू देण्याचा अनोखा निर्णय स्वर्णकार समाजानं घेतला आहे. स्वर्णकार समाजाच्या वतीने राजकोट या शहरात कोरोना लसीकरणाचं शिबिर सुरु करण्यात आलं आहे. 

स्वर्णकार समाजामार्फत या शिबिरात लस घेणाऱ्या महिलांना सोन्याचं नोझपीन दिली जात आहे तर पुरुषांना भेटवस्तूमध्ये हॅण्ड ब्लेंडर देण्यात येत आहे. या भेटवस्तूची घोषणा झाल्यानंतर नागरिकांनी लस टोचून घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे. अशाचप्रकारचा उपक्रम मेहसानामध्येही राबवण्यात आला होता. इथेही लस घेणाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या होत्या. 

हेही वाचा : हेही वाचा : २०३६ पर्यंत पुतीन सत्ते राहणार, सविंधानात केला बदल

सोनी समाजाच्या सहकार्यानं राजकोट नगरपालिकेद्वारे किशोर सिंहजी प्राथमिक विद्यालय, कोठारिया नाका, सोनी बाजारात शुक्रवार आणि शनिवारी नि:शुल्क कोरोना टीकाकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शुक्रवारी ७५१ आणि शनिवारी ५८० जणांनी लस टोचवून घेतली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा