
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील खोडारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौलतपुर ग्रँट गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रहिवासी हरिश्चंद्र याने आपल्या पत्नी करिश्माचे कुंकू पाण्याने धुऊन तिचे लग्न तिच्या कथित प्रियकराशी मंदिरात लावून दिले. ही घटना बंद खोलीत नव्हे, तर संपूर्ण गावकऱ्यांसमोर मंदिरात घडली. या प्रकरणाने परिसरात खळबळ माजली असून, लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.