esakal | खूशखबर! रेल्वेकडून बोनसची घोषणा, १२ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Railway Employees to get over Rs 17 000 bonus ahead of festive season

रेल्वेकडून बोनसची घोषणा, १२ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : दिवाळीपूर्वीच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी खूशखबर दिली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१साठी अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी (आरपीएफ-आरपीएसएफ कर्मचारी सोडून) बोनसची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा सुमारे ११.५६ लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.

केंद्राच्या निर्णयानुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाबरोबर उत्पादकतेवर आधारीत बोनसला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सरकारी तिजोरीतील १९८५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. रेल्वेने प्रत्येक वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला आहे. गेल्या वर्षी देखील रेल्वेने कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस दिला होता. गेल्यावर्षी १७,९५१ रुपयांचा बोनस कर्चमाऱ्यांना मिळाला होता.

loading image
go to top