Sundar Pichai : सुंदर पिचाईंचा आयआयटी खरगपूरमधला फोटो व्हायरल; फोटोतली मुलगीही झाली CEO

सुंदर पिचाई यांचा विद्यार्थी फोटो लोकांनी डोक्यावर घेतला आहे. आयआयटी खरगपूर येथील दिक्षांत समारंभातला हा फोटो आहे. त्यांच्यासोबत बसलेल्या शर्मिष्ठा दुबे यांनीही पिचाई यांच्याप्रमाणे उज्ज्वल करिअरचा टप्पा गाठला आहे.
Sundar Pichai
Sundar Pichai esakal

IIT Kharagpur : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आज जगातले एक नामांकित व्यक्ती आहेत. आजघडीची सगळ्यात बलाढ्य कंपनी गुगलच्या सीईओ पदावर ते विराजमान आहेत. नुकताच त्यांचा एक विद्यार्थीदशेतला फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सुंदर पिचाई यांच्या शेजारी बसलेल्या तरुणीसुद्धा एका कंपनीची सीईओ आहेत

सुंदर पिचाई यांनी गुगलमध्ये आपल्या कारकीर्दीचे २० वर्षे पूर्ण केले आहेत. त्यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला होता. त्याला लाखो लोकांनी लाईक केलं होतं. आता त्यांचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे.

हा फोटो आयआयटी खरगपूर येतील आहे. फोटोमध्ये त्यांच्या शेजारी बसलेली तरुणी आज मॅच ग्रुपची सीईओ आहे. त्यांचं नाव आहे शर्मिष्ठा दुबे. हा फोटो बघून त्यांना ओळखणंदेखील अवघड झालं आहे.

Sundar Pichai
IPL 2024 Playoffs : पांड्याच्या मुंबईने पकडली घरीची गाडी... आता कोणात्या संघाचा लागणार नंबर? जाणून घ्या प्लेऑफचे गणित

सुंदर पिचाई यांचा विद्यार्थी फोटो लोकांनी डोक्यावर घेतला आहे. आयआयटी खरगपूर येथील दिक्षांत समारंभातला हा फोटो आहे. त्यांच्यासोबत बसलेल्या शर्मिष्ठा दुबे यांनीही पिचाई यांच्याप्रमाणे उज्ज्वल करिअरचा टप्पा गाठला आहे. त्या मॅच ग्रुपच्या सीईओ आहेत. मॅच ग्रुपचे टिंडर, ओकेक्युपिड असे डेटिंग App आहेत. शर्मिष्ठा ह्या त्यांच्या बॅचच्या एकमेव विद्यार्थीनी होत्या.

Sundar Pichai
Karnataka SSLC 10th Result Declared: दहावी परीक्षेचा निकाल जाहीर; या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये सुंदर पिचाई यांना टॅग केलं आहे. यावर गुगल आणि अल्फाबेटच्या सीईओंनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सुंदर पिचाई आणि शर्मिष्ठा दुबे यांनी अमेरिकेत जावून करिअरला कलाटणी दिली. दुबे यांनी ऑनलाईन डेटिंगमध्ये अमूलाग्र बदल केले, याचं क्रेडिट त्यांनाच जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com