Karnataka SSLC 10th Result Declared: दहावी परीक्षेचा निकाल जाहीर; या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

Karnataka SSLC 10th Result :कर्नाटकातील दहावी परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान झाली होती.
SSLC 10th Result
SSLC 10th Result

बेंगळुरु- कर्नाटक राज्यातील दहावी (एसएसएलसी) परीक्षा-१ चा निकाल (10th Exam Result) आज जाहीर झाला. कर्नाटक शाळा परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकानुकार, विद्यार्थी https://karresults.nic.in या वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.

कर्नाटकातील दहावी परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान झाली होती. एसएसएलसी परीक्षेसाठी (SSLC Exam) ८.६९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४.४१ लाख मुले आणि ४.२८ मुलींनी परीक्षा दिल्याची माहिती आहे. यामध्ये ४१,३७४ रिपिटर आणि ५,४२४ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २,७५० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली होती.

SSLC 10th Result
Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

sslc.karnataka.gov.in, kseeb.kar.nic.in, karnataka.gov.in, आणि karresults.nic.in. या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७३.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे.

उडपी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सर्वात चांगली कामगिरी केली आहे. मुलांपेक्षा मुलींची कामगिरी चांगली आहे. विद्यार्थ्यांना निकाल तपासण्यासाठी हॉल तिकिटावरील रोल क्रमांक लागेल. शाळा प्रशासनाने हॉल तिकीट जपून ठेवण्यास सांगितलं आहे.

विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान ३५ टक्क्यांनी आवश्यकता आहे. मागील वर्षी याच परीक्षेचा निकाल ८ मे रोजी लागला होता. त्यावेळी एकूण विद्यार्थ्यांपैकी ८३.८९ टक्के उत्तीर्ण झाले होते.

SSLC 10th Result
LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com