
"तुमच्याकडून प्रेरणा मिळते"; गुगलचे CEO सुंदर पिचाई PM मोदींच्या भेटीला
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो पिचाई यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये सुंदर पिचाई म्हणतात, आजच्या छान भेटीबद्दल आपले धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. तुमच्या नेतृत्वाखाली तांत्रिक बदलाला मिळालेली वेगवान गती पाहणे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.. आपली भागीदारी सुरू ठेवण्यासाठी आणि सर्वांसाठी काम करणारे खुले असलेले, कनेक्ट केलेले इंटरनेट पुढे नेण्यासाठी भारताच्या G20 अध्यक्षांना पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहोत.
गुगल फॉर इंडिया या कार्यक्रमानंतर सुंदर पिचाई यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. आज गुगलने आपल्या या उपक्रमाची सुरुवात केली. पिचाई यांनी देशाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारत या विषयावर चर्चाही केली.