अपराजित भारतीय पहिलवानाची गूगल डूडलकडून दखल

भारतात एखाद्या व्यक्तीच्या ताकदीचे वर्णन करण्यासाठी 'गामा पहिलवान' हे नाव अनेक दशके प्रचलित आहे.
‘The Great Gama’
‘The Great Gama’google

मुंबई : Google search engineच्या doodle artworkद्वारे विसाव्या शतकातील भारतीय कुस्तीपटू Ghulam Mohammad Baksh Butt यांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा केला जात आहे. गुलाम हे ‘The Great Gama’ म्हणून ओळखले जातात. कलाकार वृंदा झवेरी यांनी रेखाटलेल्या डूडलमधून गुलाम यांचा भारतीय संस्कृतीवर असलेला प्रभाव दर्शवण्यात आला आहे.

‘The Great Gama’
अखेर महिला कुस्तीपटू विनेशचा माफीनामा; पण...

Ghulam Mohammad Baksh Butt हे आतापर्यंतच्या सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक मानले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम अपराजित राहिल्याने त्यांना ‘The Great Gama’ असे नाव पडले. पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील जब्बोवाल गावात जन्मलेल्या गुलाम यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सन्मान मिळवले. यात Indian versions of the World Heavyweight Championship (1910) आणि the World Wrestling Championship (1927) यांचा समावेश असतो.

भारतात एखाद्या व्यक्तीच्या ताकदीचे वर्णन करण्यासाठी 'गामा पहिलवान' हे नाव अनेक दशके प्रचलित आहे. गामा पहिलवान हे १० वर्षांचे असताना ५०० lunges आणि ५०० पुशअप्स असा व्यायाम करत असत, असे गुगल डूडल ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

‘The Great Gama’
कुस्तीपटू अंशू मलिकने रचला इतिहास; भारताला मिळालं रौप्यपदक

गुलाम यांनी १५ वर्षांचे असताना कुस्ती शिकण्यास सुरुवात केली आणि काहीच दिवसांत भारतीय वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमध्ये राष्ट्रीय नायक म्हणून त्यांना स्थान मिळाले. स्वत: काश्मिरी मुस्लीम असलेल्या गुलाम यांनी १९४७ साली फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचारातून अनेक हिंदूचे प्राण वाचवले होते.

१९६० साली गुलाम यांचा मृत्यू झाला. आयुष्यातील शेवटचा काळ त्यांनी पाकिस्तानचा भाग बनलेल्या लाहोरमध्ये घालवला. प्रिन्स ऑफ वेल्स यांनी गुलाम यांना चांदीची गदा देऊन त्यांचा सन्मान केला होता.

‘The Great Gama’
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचंय राष्ट्रीय कुस्तीपटू पल्लवी खेडकरची भावना

गुलाम यांची कारकीर्द आताच्या पिढीतील कुस्तीपटूंना प्रेरणादायी ठरते. ब्रूस ली हेसुद्धा गुलाम यांचे प्रशंसक असून आपल्या प्रशिक्षणासाठी त्यांना आदर्श मानतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com