Google Doodle : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त गुगलचा खास संदेश, पहा आजचं गूगल डूडल

आजच्या गुगल डूडलमधून अनोख्या पद्धतीने वसुंधराचे महत्त्व पटवून दिले आहे.
Google Doodle
Google Doodlesakal

Google Doodle : दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस आपण जागतिक वसुंधरा दिवस (Earth Day) म्हणून साजरा करतो. पृथ्वीच्या संरक्षणासाठी, पृथ्वी आणि पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे, ही जाणीव व्हावी, म्हणून जागतिक वसुंधरा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.

गुगलने आज या संदर्भात खास गुगल डूडल बनवले असून पर्यावरण आणि पृथ्वीला वाचविण्याचा सल्ला दिलाय. आजच्या गुगल डूडलमधून अनोख्या पद्धतीने वसुंधराचे महत्त्व पटवून दिले आहे. (Google Doodle on world earth day 2023 theme invest in our planet)

आजच्या खास गुगल डूडलमध्ये पर्यावरण वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे, याचे चित्रण केले आहे. सुंदर असं गुगल डूडल दिसायलाही खूप छान दिसतंय.

Google Doodle
World Earth Day 2023 : तुमच्यासहीत मुलांचंही भविष्य वाचवा, या इकोफ्रेंडली वस्तू वापरा

१९७० पासून वसुंधरा दिवस हा दरवर्षी २२ एप्रिलला साजरा केला जातो. पृथ्वी वाचावी, पृथ्वीवर होणारे प्रदुषण थांबावे, पृथ्वी आपली आई आहे आणि तिच्या रक्षणासाठी प्रयत्न करावे, हे उद्दीष्ट हा दिवस साजरा करण्यामागे असतो. जवळपास १९२ देश हा दिवस साजरा करतात.

यंदा जागतिक वसुंधरा दिवसाची थीम आहे Invest in our planet. म्हणजेच आपल्या पृथ्वीवर चांगल्या गोष्टी इनवेस्ट करा ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com