

vaibhav murder gorakhpur
esakal
गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील खजनी परिसरातील सराफा व्यावसायिक हनुमान वर्मा यांच्या १० वर्षांच्या मुलाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे मुख्य आरोपी सर्वेश शर्मा याच्या कुटुंबातील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.