सामाजिक संपर्क टाळा; सरकारचे नागरिकांना आवाहन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक संपर्क टाळणे हे अत्यंत आवश्‍यक असल्याचे सांगत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले असून त्याचाच भाग म्हणून जनतेला वारंवार आवाहन केले जात आहे. 

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक संपर्क टाळणे हे अत्यंत आवश्‍यक असल्याचे सांगत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले असून त्याचाच भाग म्हणून जनतेला वारंवार आवाहन केले जात आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रतिबंधात्मक उपायांवर सरकार भर देत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युचे आवाहन केले आहे. एक दिवस पूर्ण सहकार्य केल्याने आपण संसर्गाची साखळी तोडू शकतो. त्यामुळे सामाजिक संपर्क टाळणे अत्यावश्‍यक आहे. या विषाणूशी सामना करताना नागरिकांना कोणत्याही जीवनावश्‍यक वस्तूंची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले. देशातील सर्व राज्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून केंद्र सरकारनेही राज्यांच्या कोरोनाविरोधातील मोहिमेला बळकटी आणण्यासाठी पथके रवाना केली आहेत, असे अगरवाल यांनी सांगितले. जयपूरमध्ये आज इटलीच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला. तो संसर्गमुक्त झाला होता. हा मृत्यू कोरोना विषाणूच्या बळींच्या संख्येत मोजणार नसल्याचेही अगरवाल यांनी सांगितले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशात आज पन्नास नवे रुग्ण आढळले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government appealed to citizens Avoid social contact