
नवी दिल्ली : बिहारमधील विशेष मतदार यादी पडताळणी मोहिमेवरून संसद अधिवेशनातला गोंधळ कायम असून दोन्ही सभागृहांमधील कामकाज सुरळीत चालण्याची शक्यता कमी झाली आहे. लोकसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे राष्ट्रीय क्रीडा प्रशासकीय विधेयक आणि डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक सरकारला मांडता आले नाही. त्यापार्श्वभूमीवर सरकारने विरोधकांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे, की गोंधळ थांबणार नसेल तरीही या स्थितीत विधेयके मंजूर केली जातील.