esakal | आमच्या सरकारमध्ये म्हशी, गाई किंवा महिला असे सारेच सुरक्षित
sakal

बोलून बातमी शोधा

yogi aadityanath

आमच्या सरकारमध्ये म्हशी, गाई किंवा महिला असे सारेच सुरक्षित

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ - पूर्वी आमचे कार्यकर्ते एखाद्या कुटुंबाच्या घरात राहायचे तेव्हा तेथील गुंडगिरीमुळे आम्हाला कधी सुरक्षित वाटणार असे महिला विचारायच्या. पश्चिम उत्तर प्रदेशातून एखादी बैलगाडी गेली तरी गाई-म्हशींना सुरक्षित वाटायचे नाही, पण आता आमच्या सरकारमध्ये म्हशी, गाई किंवा महिला असे सारेच सुरक्षित आहेत, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

लखनौमधील भाजप मुख्यालयात त्यांनी प्रवक्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यावेळी, पश्चिम उत्तर प्रदेशात नेहमीच समस्या होत्या. पूर्वेत त्या नव्हत्या. आता तशी स्थिती नाही, असे सांगून त्यांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्या. तुम्हाला हा फरक दिसत नाही का ? आज म्हैस असो किंवा महिला...तिला बळजबरीने पकडता येते का ? हा फरक नाही का ? उत्तर प्रदेशची ओळख काय होती? असे सवाल उपस्थित करीत ते म्हणाले की, जेव्हा रस्त्यात खड्डे यायचे तेव्हा उत्तर प्रदेश यायचा. जेव्हा अंधार पसरायचा तो भाग उत्तर प्रदेशचा असायचा. कोणतीही सुसंस्कृत व्यक्ती रात्री रस्त्यावर चालताना घाबरायची, पण आज तसे नाही.

loading image
go to top