राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राकडून 'एक रूपया'

वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

अयोध्येत राममंदिराच्या उभारणीचा श्रीगणेशा करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला आज सरकारकडून एक रुपयाची पहिली देणगी देण्यात आली.

नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिराच्या उभारणीचा श्रीगणेशा करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला आज सरकारकडून एक रुपयाची पहिली देणगी देण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गृहविभागाचे उपसचिव डॉ. मुर्मू यांनी आज केंद्र सरकारच्यावतीने या न्यासाला ही देणगी दिली. दरम्यान, राममंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेला न्यास सर्वप्रकारच्या देणग्यांचा स्वीकार करणार असून, त्यामध्ये रोख पैसे, स्थावर मालमत्ता यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही अटी घालण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भयानक : लँडिग होतानाच विमानाचे तीन तुकडे; प्रवाशांचे काय झाले फोटो नक्की पाहा

सुरुवातीला या ट्रस्टचे काम हे ज्येष्ठ विधिज्ञ के. पराशरन यांच्या घरातूनच चालणार असून, त्यानंतर त्यासाठी वेगळे कार्यालय तयार केले जाईल. दरम्यान याआधी केंद्र सरकारने अयोध्येत राममंदिराची उभारणी करण्यासाठी पंधरा सदस्यांचा समावेश असलेले विश्‍वस्त मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच यासंबंधीची घोषणा संसदेमध्ये केली होती.

भारतीय कलाकारांना नाचवून तो भारतविरोधी कारवायांनाच करायचा फंडिंग

न्यासाला वेगळे कार्यालय
या न्यासाचे नोंदणीकृत कार्यालय हे दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश येथे असेल, यामध्ये अनुसूचित जातीच्या एका सदस्याचाही समावेश असेल. या विश्‍वस्त मंडळातील सदस्यांमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ के. पराशरन, अलाहाबादच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, ऊडूपी येथील पेजावर मठाचे विश्‍व प्रसन्नतीर्थ, हरिद्वार येथील परमानंद महाराज, पुण्यातील गोविंदगिरीजी महाराज आणि अयोध्येतील विमलेंद्रप्रताप मिश्रा यांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय अयोध्येतील अनिल मिश्रा, पाटण्यातील कमलेश्‍वर चौपाल आणि निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास यांचाही या विश्‍वस्त मंडळामध्ये समावेश असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Donates Rs 1 In Cash To Ayodhya Ram Temple Trust For Work To Begin