भारतीय कलाकारांना नाचवून 'तो' भारतविरोधी कारवायांनाच करायचा फंडिंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

  • अमेरिकेतील पाकिस्तानचा "डार्लिंग' रडारवर

ह्युस्टन : भारतीय कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करून तो पैसा अमेरिकेतील भारतविरोधातील कारवायांना पुरवणारा पाकिस्तानचा इव्हेंट मॅनेजर हा भारतीय अधिकाऱ्यांच्या रडारवर आला आहे. बॉलिवूडचा "डार्लिंग' म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा रेहान सिद्दीकीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याने भारत-अमेरिकी समुदायाने स्वागत केले आहे. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खानने ह्यूस्टन येथे होणाऱ्या प्रस्तावित कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेत बॉलिवूड कलाकारांचे शो आयोजित करणारा रेहान सिद्दीकी हा भारतविरोधी कारवायांना पैसा पुरवण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहे. यासंदर्भात भारत-अमेरिकी समुदायाने केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मात्र याबाबत ठोस कारवाई होत नसल्याने बॉलिवूड कलाकार आणि गायकांचे "शो' सुरूच होते आणि त्यातून जमा होणारा पैसा भारतविरोधी कारवायासाठी पुरविला जात असे. मात्र आता रेहान सिद्धीकी भारत सरकारच्या रडारवर आल्याने भारत-अमेरिकी समुदायाने सुटकेचा निश्‍वास सोडल्याचे म्हटले आहे. सिद्दीकी यांची बराच काळापासून चौकशी सुरू आहे, मात्र ठोस हाती काहीच लागत नव्हते, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

भयानक : लँडिग होतानाच विमानाचे तीन तुकडे; प्रवाशांचे काय झाले फोटो नक्की पाहा

अमेरिकेत एका रेडिओ स्टेशनचा मालक असणारा सिद्दीकीच्या हालचालींवर भारत सरकारकडून लक्ष ठेवले जात असल्याचे सूत्राने सांगितले. भारतीय समुदायातील प्रतिष्ठित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकीने गेल्या काही वर्षांत जम्मू काश्‍मीर विरोधात कारवायांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा दिला आहे. तसेच जम्मू काश्‍मीरमधून कलम 370 काढल्यानंतर या कारवायांना अधिकच वेग आला. समुदायाचे सदस्य नवन डी कौर यांच्या मते, गेल्या सप्टेंबरमध्ये "हाऊडी मोदी' कार्यक्रमादरम्यान भारतविरोधी मोर्चा काढणाऱ्या संयोजकांना सिद्दीकीने मदत केली होती. मात्र जेव्हा पाकिस्तानच्या सुरक्षा संस्थेशी सिद्दीकीचे संबंध उघडकीस आले, तेव्हा भारत सरकारने त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. सिद्दीकीला बॉलिवूडचा "डार्लिंग' असेही म्हटले जाते.

मोदींचा 'तो' निर्णय आत्मघातकीच : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप

ह्युस्टनच्या मनोरंजन आणि भारतीय माध्यमांवर त्याचे वर्चस्व असल्याने त्याचा दबदबा होता, असे राजीव वर्मा यांनी सांगितले. यादरम्यान बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याने ह्युस्टन येथील सिद्धीकीने आयोजित केलेला प्रस्तावित कार्यक्रम रद्द केल्याचे माध्यमांनी वृत्त दिले आहे. हा कार्यक्रम एप्रिलमध्ये होणार होता. सलमान खानच्या निर्णयाचे भारतीय नागरिकांनी स्वागत केले आहे. असे असले तरी सिद्दीकीने येत्या 13 मार्चला गझलगायक पंकज उधास यांचा "नायाब लम्हे' तर 29 मार्चला रॅपर बादशाहचा कार्यक्रम आयोजित केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan man comes under Indian govt radar for funding anti-India activities in US