Government Employee: 'या' चार राज्यांनी वाढवला सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार; महाराष्ट्र सरकार कधी घेणार निर्णय?
केंद्रापाठोपाठ अनेक राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक राज्यांमध्ये आता ५८ टक्के महागाई भत्ता झाला आहे. त्यातच आता केंद्राने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे.
DA Hike: दिवाळीपूर्वी काही राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. झारखंड, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्य सरकारांनी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधाराकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.