केंद्र सरकारची 600 हून अधिक सोशल मीडिया खाती हॅक : अनुराग ठाकूर

Anurag Thakur
Anurag Thakuresakal
Summary

या वर्षात आतापर्यंत 28 खाती हॅक केली गेली आहेत.

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारची तब्बल 600 हून अधिक सोशल मीडिया खाती हॅक (Social Media Accounts Hacked) करण्यात आली आहेत, अशी माहिती मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मंगळवारी लोकसभेत दिली.

सरकारी ट्विटर हँडल (Government Twitter handle) आणि ईमेल खाती हॅक करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय मंत्री ठाकूर पुढे म्हणाले, 2017 पासून अशी तब्बल 641 खाती हॅक करण्यात आली आहेत. 2017 मध्ये 175 खाती, 2018 मध्ये 114 खाती, 2019 मध्ये 61 खाती, 2020 मध्ये 77 खाती, 2021 मध्ये 186 खाती आणि या वर्षात आतापर्यंत 28 खाती हॅक केली गेली आहेत.

Anurag Thakur
हिजाब, हलालनंतर कर्नाटकात फळांच्या दुकानांवरून वाद

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची देखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी खिल्ली उडवलीय. श्रीमती गांधी त्यांच्या कुटुंबाबाहेर दिसत नाहीत, त्यामुळं काँग्रेस पक्ष एका कुटुंबापुरता मर्यादित आहे. श्रीमती गांधींची चिंता आपण समजू शकतो, कारण त्या गांधी घराण्याच्या बाहेर दिसत नाहीत. कुटुंबातील सर्वांनी प्रयत्न करून पाहिले, तरी निवडणुकीत काँग्रेसचं खातंही उघडत नाही, असा टोला त्यांनी लगावलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com