हिजाब, हलालनंतर कर्नाटकात फळांच्या दुकानांवरून वाद

Fruit Shops in Karnataka
Fruit Shops in Karnataka esakal
Summary

हिजाब, हलाल आणि लाऊडस्पीकरनंतर आता कर्नाटकात आणखी एका वादानं जन्म घेतलाय.

हिजाब (Hijab Controversy), हलाल आणि लाऊडस्पीकरनंतर आता कर्नाटकात (Karnataka) आणखी एका वादानं जन्म घेतलाय. राज्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Organization) हिंदूंना फळे विक्रीच्या व्यवसायात उतरण्याचं आवाहन केलंय. कारण, हा व्यवसाय मुस्लिमांनी व्यापलाय. हिंदू जनजागृती समितीनं मंगळवारी सांगितलं की, बहुतांश फळ विक्रेते मुस्लिम (Muslim) असून त्यांनी संपूर्ण बाजारपेठ काबीज केलीय. हे लोक अनेक पिढ्यांपासून फळं विकत असल्यानं नवीन फळ व्यावसायिकांना आपला व्यवसाय चालवणं कठीण होत आहे.

समितीनं पुढं सांगितलं की, तुम्ही कोणाकडून माल घ्यावा, हे आम्ही तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला पाहिजे त्या व्यक्तीकडून माल घ्यावा, फळांच्या व्यापारात हिंदूंचाही सहभाग असावा, एवढीच आमची इच्छा आहे. या कामात गरीब फळ व्यापाऱ्यांनाही मदत करावी, अशी आमची सरकारला विनंती असल्याचंही समितीनं म्हंटलंय. याआधी भाजपचे सरचिटणीस सीटी रवी यांनी हलाल मांसाबाबत केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता. हलाल मांस हा एक प्रकारचा आर्थिक जिहाद असल्याचं ते म्हणाले होते. हलाल मांस विक्रीची संपूर्ण संकल्पना अशी आहे की, केवळ मुस्लिमच आपापसात व्यापार करू शकतात. हलाल मांस (Halal Meat) विकणारा देखील मुस्लिम आहे आणि तो खाणारा देखील मुस्लिम आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

Fruit Shops in Karnataka
RSS च्या पथसंचलनावर फुलांचा वर्षाव करणाऱ्या मुस्लिम डॉक्टराविरुध्द फतवा

राज्यातील काही हिंदू संघटनांनीही मांस दुकानातून हलाल मीटचं प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात केलीय. हिंदू जागृती समिती, श्रीराम सेना (Shriram Sena) आणि बजरंग दल (Bajrang Dal) यांसारख्या संघटनांनी हिंदूंना हिंदू धर्माच्या श्रद्धेनुसार मांस खाण्याचं आवाहन केलंय. याशिवाय मशिदीच्या मिनारावरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी अनेक संघटना करत आहेत. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) म्हणाले, अजानचा प्रश्न बळजबरीनं नाही तर सर्वांशी बोलून सोडवला जाईल, असं त्यांनी नमूद केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com