गोंधळ निर्माण झाल्याने केंद्राकडून आधारबाबतचं 'ते' परिपत्रक मागे

आता या नियमावलीचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे लक्षात घेताच त्यांनी प्रसिद्धपत्रक तात्काळ मागे घेतलंय.
adhar card
adhar cardsakal
Updated on

आधारकार्डबाबत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नागरीकांना सतर्क करत निर्देश दिले होते की आधार कार्डच्या फोटोकॉपी कोणत्याही संस्थांसोबत शेअर करू नका. अशा आशयाची त्यांनी नियमावली सादर केली होती. मात्र या नियमावलीवर गोंधळ निर्माण झाल्याने केंद्र सरकारने आज त्याबाबतचं स्पष्टीकरण देत ही नियमावली मागे घेतली आहे.

adhar card
BSP : रामपूर लोकसभा पोटनिवडणूक बसपा लढवणार नाही; मायावतींचा मोठा निर्णय

UIDAI ने लोकांना निर्देश देताना म्हटले होते की आधार कार्डच्या फोटोकॉपी कोणत्याही संस्थांसोबत शेअर करू नका, कारण त्याचा गैरवापर होत आहे. याशिवाय आधार कार्ड ऐवजी त्यांच्या मास्क आधार कार्डचा वापर करावा असा सल्ला सुद्धा दिला होता. मात्र आता या नियमावलीचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसिद्धपत्रक तात्काळ मागे घेतलंय.

adhar card
आधार कार्डची झेरॉक्स शेअर करू नका, अन्यथा... UIDAI चे निर्देश

UIDAI आधीच्या परीपत्रकात सांगितले होते की ई-आधार डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट कॅफे सारखी सार्वजनिक संगणक वापरणे टाळा. जर तुम्ही असे केल्यास त्या संगणकावरून ई-आधारच्या डाउनलोड केलेल्या सर्व कॉपी कायमस्वरूपी हटवल्याची खात्री करा. फक्त ज्या संस्थांनी UIDAI कडून युजर परवाना घेतला आहे तेच एखाद्या व्यक्तीची ओळख व्हेरीफाय करण्यासाठी आधार वापरू शकतात.

adhar card
BSP : रामपूर लोकसभा पोटनिवडणूक बसपा लढवणार नाही; मायावतींचा मोठा निर्णय

हॉटेल्स किंवा फिल्म हॉल सारख्या विनापरवाना खाजगी संस्थांना आधार कार्डच्या कॉपी गोळा करण्यास किंवा ठेवण्याची परवानगी नाही. आधार कायदा 2016 अंतर्गत हा गुन्हा आहे. जर एखाद्या खाजगी संस्थेने आधार कार्ड पाहण्याची मागणी केली किंवा आधार कार्डची कॉपी मागितली तर त्यांच्याकडे UIDAI कडून वैध युजर परवाना असल्याची पडताळणी करा, असेही UIDAIने परिपत्रकात सांगितले होते. मात्र यावरुन गोंधळ निर्माण झाल्याचे लक्षात येताच हे परिपत्रक मागे घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com