Jammu-Kashmir: 20 वर्षांपूर्वी वडिलांना संपवलं आता मुलाला गोळ्या घातल्या; दहशतवाद्यांकडून सरकारी कर्मचारी लक्ष्य

Jammu and Kashmir Rajouri District: सध्या देशभरात लोकसभेचं वातावरण आहे. त्याच दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये ही हिंसक घटना घडली आहे.
Jammu and Kashmir
Jammu and Kashmir

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्याला टार्गेट केलं आहे. २२ एप्रिलच्या सायंकाळी दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय मोहम्मद रजाक हे राजौरी जिल्ह्यातील एका मशिदीमधून बाहेर पडत होते. यावेळी आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या आहेत. (Government Official Shot Dead by Terrorists in Jammu and Kashmir Rajouri District)

मोहम्मद रजाक हे समाज कल्याणमध्ये सरकारी कर्मचारी आहेत. २० वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली होती. आता मुलाला देखील लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे रजाक यांच्या घरी शोककळा पसरली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. सदर घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालंय.

Jammu and Kashmir
Jammu Kashmir Accident News : जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; टॅक्सी दरीत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार रजाक यांचे बंधू प्रादेशिक सैनेमध्ये कर्मचारी आहेत. सध्या देशभरात लोकसभेचं वातावरण आहे. त्याच दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये ही हिंसक घटना घडली आहे. दुसरीकडे, राजकीय नेत्यांचा आपल्या पक्षाचा जोरदार प्रचार सुरु आहे. अनंतनागमध्ये ७ मे रोजी मतदान पार पडणार आहे.

सोमवारी सायंकाळी रजाक यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेनंतर सुरक्षा दल सक्रिय झालं आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. रजाक यांचे कुटुंबीय दहशतवाद्यांकडून झालेला हा मोठा हल्ला सहन करत आहेत. २० वर्षांपूर्वी मोहम्मद रजाक यांच्या वडिलांना देखील दहशतवाद्यांनी संपवलं होतं. मोहम्मद अकबर असं त्यांच्या वडिलांचं नावं होतं.

Jammu and Kashmir
Loksabha Election: आता फक्त ३९९! लोकसभा निवडणुकीत भाजपने उघडलं खातं, सुरतमध्ये उधळला विजयाचा गुलाल, काय घडलं नेमकं ?

रजाक यांच्या हत्येनंतर राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दु:ख व्यक्त करत म्हटलंय की, दहा दिवसामध्ये अशाप्रकारची ही तिसरी हत्या आहे. आमच्या संवेदना पीडित कुटुंबाप्रती आहेत. दुसरीकडे काँग्रेसने देखील या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सरकारी कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. (Jammu And Kashmir News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com