IT Ministry rules
IT Ministry ruleseSakal

ऑफिसच्या कम्प्युटरवर गेम्स, चित्रपट डाऊनलोड करु नका! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आयटी मंत्रालयाचे निर्देश

देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे निर्देश देण्यात आले आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक नवीन सूचना दिली आहे. ऑफिसच्या कम्प्युटरवर गेम्स, चित्रपट किंवा मनोरंजनाच्या इतर साईट्स उघडण्यास आणि असा कंटेंट डाऊनलोड करण्यास या कर्मचाऱ्यांना मज्जाव करण्यात आला आहे. देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे निर्देश देण्यात आले आहेत.

यासोबतच, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया आणि अन्य नेटवर्किंग साईटवर आपली खासगी माहिती कमी प्रमाणात शेअर करावी असंही आयटी मंत्रालयाने आपल्या सूचनेत म्हटलं आहे.

IT Ministry rules
Mumbai News : मोबाईलवर गेम खेळताना 22 व्या मजल्यावरून पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

लोकांची डिजिटल सुरक्षा

सरकारकडे देशातील नागरिकांची विविध प्रकारची माहिती डिजिटल स्वरुपात साठवलेली असते. त्यामुळे सरकारी विभागातील कम्प्युटर किंवा अन्य डिजिटल उपकरणे हॅक झाल्यास ही माहिती चोरली जाऊ शकते. अशा प्रकारच्या हॅकिंगपासून वाचण्यासाठी इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) ने हे नियम निर्धारित केले आहेत.

CERT ही संस्था देशाच्या आयटी मंत्रालय अंतर्गत काम करते. मंत्रालयाने सांगितलं, की देशातील शिक्षण, आरोग्य, बँकिंग असे विभाग आता डिजिटल झाले आहेत. २०२५ सालापर्यंत डिजिटल अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य मंत्रालयाने समोर ठेवलं आहे.

IT Ministry rules
Battlegrounds Mobile India : भारतात परत आली BGMI गेम; असं परत मिळवा तुमचं जुनं अकाउंट आणि डेटा

हनी ट्रॅपपासून सावध

CERT ने सरकारी कर्मचाऱ्यांना हनी-ट्रॅपपासून सावध राहण्याचाही इशारा दिला आहे. सोशल मीडियावर आलेली मित्र विनंती स्वीकारण्यापूर्वी ती प्रोफाईल पूर्णपणे तपासून घ्यावी, असं या निर्देशांमध्ये म्हटलं आहे. तसेच, कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर सरकारी सूचना, डॉक्युमेंट सोशल मीडियावर शेअर करू नये असंही सांगण्यात आलं आहे.

इतर निर्देश

कर्मचाऱ्यांनी दर १२० दिवसांनंतर आपले पासवर्ड बदलावेत असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांनी मोबाईलमधील वायफाय, ब्लूटूथ हे कायम सुरू ठेऊ नये. नवीन अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी केवळ गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपलचं अ‍ॅप स्टोअर अशा अधिकृत प्लॅटफॉर्मचा वापर करावा असंही यात म्हटलं आहे.

IT Ministry rules
Vande Bharat : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वंदे भारतचं तिकीट कमी होण्याची शक्यता; चर्चा सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com