

English Medium Preference:
sakal
बेळगाव: शिक्षण खात्याकडून सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी अनेक चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दरवर्षी सरकारी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत होणारी घट अतिशय चिंताजनक असून मोफत प्रवेश, दोन गणवेशांचे जोड, पाठ्यपुस्तकांचे वाटप, क्षीरभाग्य, माध्यान्ह आहार अशा अनेक योजना असूनही अलीकडच्या काही वर्षांत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातील सरकारी शाळांतील प्रवेश दर ३० टक्क्यांनी कमी झाला आहे. तसेच, शिक्षण खात्याच्या माहितीनुसार सरकारी शाळांमध्ये ३८ टक्के विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. तर तब्बल ६२ टक्के विद्यार्थी खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.
- मिलिंद देसाई