Government Schools Closed India : देशात ५ वर्षांत १७ हजार सरकारी शाळा बंद, अहवालातून धक्कादायक माहिती उघड; शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

School Mergers India : देशभरात कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या विलीनीकरणावर मोठी चर्चा सुरू आहे. गेल्या ५ वर्षांत भारतात एकूण १७,१४१ सरकारी शाळा बंद झाल्या आहेत. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी ही आकडेवारी मांडली.
Government Schools Closed India

Government School

esakal

Updated on

Government Schools Closed: शाळांचे एकत्रीकरण हा गेल्या काही काळापासून देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे इतर शाळांमध्ये विलीनीकरण करण्यावरून बरीच चर्चा आणि वादंग निर्माण झाले आहेत.यापूर्वी अनेक राज्यांमधील सरकारी शाळा बंद होण्याचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला होता.संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारने यासंदर्भातील माहिती दिली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत देशभरात १७,१४१ सरकारी शाळा बंद पडल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com