''कोरोनाच्या तिसऱ्या डोसची गरज, सरकारने राष्ट्रीय धोरण लवकर जाहीर करावं'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

''कोरोनाच्या तिसऱ्या डोसची गरज, सरकारने राष्ट्रीय धोरण लवकर जाहीर करावं''

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : देशात लसीकरण (Corona vaccination Drive) प्रचंड वेगाने होत आहे. तसेच ज्यांनी अद्यापही कोरोना लस घेतलेली नाही त्यांच्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून जनजागृती केली जात आहे. पण, लवकरच कोरोनाच्या तिसऱ्या डोसची (corona vaccination booster dose) गरज भासेल असं तज्ज्ञाकडून सांगितले जात आहे. बूस्टर डोससाठी काय धोरण आहे याबाबत डॉक्टरांकडून विचारणा केली जात असून सरकारने लवकरच कोरोनाच्या तिसऱ्या डोससंबधित राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी डॉक्टरांची मागणी आहे.

हेही वाचा: ...अन् टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, यूटर्न घेत इंदुरीकरांनी सुरू केली जनजागृती

''देशात सुरुवातील डॉक्टरांना कोरोना लस देण्यात आली होती. त्यावेळी दोन्ही डोसमधील अंतर हे २८ दिवसांचं होतं. पण, दोन डोसमधील अंतर वाढल्यानंतर कोरोनाची लस जास्त प्रभावी असते, असं सांगण्यात आलं. त्यामुळे डॉक्टरांवर जास्त प्रभाव झाला नसावा. आता डॉक्टरांना प्राधान्य देऊन तिसरा डोस देण्यात यावा'', असं आयएमएचे वरिष्ठ अधिकारी डॉ. रवी वानखेडेकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

''अनेक खासगी रुग्णालयात कोरोना लशींचे डोस पडलेले आहेत. सरकारने तिसऱ्या डोससाठी धोरण जाहीर केले तर त्या लशींचा वापर होईल. सरकारने तिसऱ्या डोससाठी एक राष्ट्रीय धोरण लवकरच जाहीर करावे. त्यामुळे लोकांना फायदा होईल'', असं विदर्भ हॉस्पीटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अर्बाट म्हणाले.

सरकारने २०२२ ची वाट पाहू नये -

''आपण नवीन वर्षात पदार्पण करत असताना कोरोनाचा तिसरा डोससाठी धोरण जाहीर करण्याची ही योग्य वेळ आहे. २०२१ ची सुरुवात झाली त्यावेळी याच काळात कोरोनाचं संक्रमण वाढलं होतं. फेब्रुवारी महिन्यात डेल्टा व्हेरीयंटने धुमाकूळ घातला होता आणि देशात दुसरी लाट आली होती. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ ची वाट पाहण्यापेक्षा सरकारने आताच तिसऱ्या डोससाठी धोरण जाहीर करावे'', असं संसर्गजन्य रोग विशेषतज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांचं म्हणणं आहे.

''अनेक नागरिकांनी अनधिकृतपणे लशीचा तिसरा डोस घेतला आहे. मात्र, काही जण अद्यापही सरकारच्या धोरणाची वाट पाहत आहेत, असं नागपुरातील प्रसिद्ध खासगी रुग्णालयाच्या संचालकांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितले. ते म्हणाले, ''कोरोना लशीचा तिसरा डोसला अमेरिकेत अधिकृतपणे मान्यता मिळाली आहे. पण, आपले सरकारने जेव्हा कोरोनाची स्थिती आणखी बिकट होईल तेव्हा निर्णय घेईल. तिसरा डोस हा एक पर्याय ठेवू शकतात, किंवा त्यासाठी पैसे आकारले जावे किंवा तो डोस ऐच्छिक ठेवावा.''

loading image
go to top