Tur Procurement : प्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदीला वेग
Farmers Welfare : प्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदीला वेग देण्यात आला असून सरकार तूर, उडीद आणि मसूर हमीभावाने खरेदी करण्यास वचनबद्ध आहे. पीएम-आशा योजना २०२५-२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
नवी दिल्ली : भारत सरकारने एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान(पीएम-आशा) ही योजना १५ व्या वित्त आयोगाच्या काळात २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे.