पॅरासिटामॉल गोळीसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय.... 

पॅरासिटामॉल गोळीसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय.... 

मुंबई- ताप, अंगदुखी सारख्या आजारांवर सर्वात आधी भारतात पॅरासिटामॉल औषध घेण्याची परंपरा आहे. बहुतांश भारतीय वर्षभरात किमान एकदा तरी पॅरासिटामॉल औषधाचे सेवन करतात. मात्र याच पॅरासिटामॉल आरोग्याला अपायकारक असल्याचं सांगत केंद्र सरकारनं या औषधावर बंदी आणली होती. औषध नियंत्रक विभागाने (डीसीजीआय) तसेच अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) पॅरासिटामॉल औषधावर कडक बंधने घातली होती. मात्र आता सरकारने पॅरासिटामॉल औषधावरील निर्यात बंदी मागे घेतली आहे. हे औषध ताप आणि अंगदुखीवर घेतलं जातं. 

सरकार निर्यातीवरील बंदी उठवली

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पॅरासिटामॉलसह काही औषधे आणि औषधांच्या निर्यातीवर प्रतिबंध आणण्यात आले होते. मात्र आता पॅरासिटामॉलच्या निर्यातीवरील बंदी उठविण्यात आली आहे. बंदीपूर्वी त्याच्या मागणीत वाढ झाली होती. त्यानंतर देशात या औषधाची कमतरता नव्हती, हे लक्षात घेता सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. पॅरोसिटामॉलच्या निर्यातीवर बंदी असूनही, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने गेल्या दोन महिन्यांत सुमारे 120 देशांना पॅरासिटामॉल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधांचा पुरवठा केला आहे. 

गेल्या महिन्यात सरकारनं टिनिडाझोल, मेट्रॅनिडाझोल, अ‍ॅसिक्लोव्हिर, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, क्लोराम्फेनीकोल या औषधांवरील बंदी हटवली आहे. 

म्हणून पॅरासिटामॉलवर घातली होती बंदी 

देशात विकल्या आणि सेवन केल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉल औषधाची कोणतीही टॅबलेट 325 एमजी पेक्षा जास्त क्षमतेची असू नये. तसंच पॅरासिटामॉल आणि अन्य औषधांचे मिश्रण करुन तयार केलेल्या टॅबलेटमध्येही पॅरासिटामॉलचे प्रमाण 325 एमजी पेक्षा जास्त ठेवू नये, असा नियम डीसीजीआय आणि एफडीएने केला होता. सध्या देशात विकल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलच्या टॅबलेट 500 ते 650 एमजीच्या आहेत. या अतिरिक्त पॅरासिटामॉलचे सेवन केल्यास शरीर सुजण्याचा तसंच हळू-हळू यकृत (लिव्हर) अकार्यक्षम होण्याचा किंवा यकृताचा कॅन्सर होण्याचा धोका असल्याचंही तज्ज्ञांनी सांगितलं होतं. 

कोरोनाच्या संकटात वापर केल्यानं मागणी 

कोरोना व्हायरसमुले जगभरात या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे औषधं केवळ श्रीमंत आणि सामर्थ्यशाली देशांनाच नव्हे तर कमी विकसित देशांनाही उपलब्ध होऊ शकतात या उद्देशाने भारताने या औषधांच्या निर्यातील निर्बंध आणले होते. बंदीच्या वेळी भारताने 40 पेक्षा जास्त देशांना हे औषधं विनामूल्य किंवा नि: शुल्क दिलं असल्याचं समजतंय.

government tool very important decision about paracetamol tablet

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com