कोरोनासंदर्भातील 'हे' आहेत मुंबईतील सर्वात खतरनाक वॉर्ड्स, डेंजर झोन्स... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनासंदर्भातील 'हे' आहेत मुंबईतील सर्वात खतरनाक वॉर्ड्स, डेंजर झोन्स...

बुधवारी मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 33 हजार 835 वर पोहोचली. सर्वाधिक कोरोना रुग्ण हे जी उत्तर वॉर्डमध्ये आहेत. या वॉर्डमध्ये धारावी परिसराचा भाग येतो. 

कोरोनासंदर्भातील 'हे' आहेत मुंबईतील सर्वात खतरनाक वॉर्ड्स, डेंजर झोन्स...

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा अधिक प्रार्दुभाव आहे. त्यात मुंबईत कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. देशाचा कोरोनाबाधितांची संख्या पाहिल्यावर लक्षात येतं की, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि त्यानंतर राज्यातला आकडा पाहिल्यावर मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. बुधवारी मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 33 हजार 835 वर पोहोचली. सर्वाधिक कोरोना रुग्ण हे जी उत्तर वॉर्डमध्ये आहेत. या वॉर्डमध्ये धारावी परिसराचा भाग येतो. 

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली धारावी आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. धारावीत कोरोनाने कहर केला आहे.  मुंबईतल्या धारावीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. धारावीतल्या हॉटस्पॉटमध्ये हजारो लोकांची तपासणी करण्यात येतेय, अनेकांना क्वारंटाईन करण्यात येतंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सध्या धारावी परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरातील लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. 

कोरोनातून बरे झालेले जितेंद्र आव्हाड स्वतः सांगतायत, कोरोना, राजकारण आणि बरंच काही...

मुंबईचा आकडा धक्कादायक 

गेल्या सात दिवसांत कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणं दररोज सरासरी 5.17 टक्क्यांनी वाढताना दिसताहेत. माहीम, धारावी आणि दादर या परिसरात तब्बल 2 हजार 728 कोरोना रुग्ण आहेत. धारावी परिसरातील वाढत्या प्रकरणांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढतेय. दुसरीकडे आर उत्तर म्हणजे दहिसर क्षेत्रात सर्वात कमी 309 कोरोना रुग्णांची नोंद आहे. 

मुंबईत 2 हजारपेक्षा जास्त रुग्ण असलेले वॉर्डची आकडेवारी खालीलप्रमाणे 

 • जी उत्तर वॉर्ड - धारावी, माहीम, दादर - 2728
 • ई वॉर्ड - भायखळा, नागपाडा, माझगाव -2438
 • एफ उत्तर वॉर्ड - माटुंगा किंग सर्कल- 2377
 • एल वॉर्ड - कुर्ला- 2321
 • एच पूर्व वॉर्ड - बांद्रा, सांताक्रुझ पूर्व- 2094
 • के पश्चिम वॉर्ड - अंधेरी पश्चिम- 2049

अरे देवा! मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी लागणार 'इतक्या' महिन्यांचा कालावधी

या वॉर्डमध्ये 2 हजारपेक्षा कमी रुग्ण 

 • जी दक्षिण - वरळी, प्रभादेवी, एल्फिन्स्टन- 1905
 • के पूर्व - अंधेरी पूर्व- 1875
 • एम पूर्व - गोवंडी, मानखुर्द- 1696
 • एफ दक्षिण - परेल दादर पूर्व- 1648
 • एन वॉर्ड - घाटकोपर- 1525
 • एस वॉर्ड - विक्रोळी, भांडुप नाहूर- 1278
 • आर उत्तर - दहिसर -309

these wards of mumbai has most numbers of covid19 patients danger zones of mumbai