Satyapal Malik | PM मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्यपाल मलिक यांचे स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्यपाल मलिक यांचे स्पष्टीकरण

कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात मृत्यू झालेले शेतकरी माझ्यासाठी मेले का? असं मोदी म्हणाल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला होता.

PM मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्यपाल मलिक यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) भूमिकेवर अमित शहांनी (Amit Shah) प्रश्न उपस्थित केल्याचा दावा मेघायलयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केला होता. आता मलिक यांनी युटर्न घेतला असून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मलिक यांनी म्हटलं की, मी असं म्हटलं नाही की, अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही चुकीचं म्हटलं. अमित शहा तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतात. त्यांच्याबद्दल काहीच चुकीचं बोलले नाहीत. पण शहांनी हे नक्कीच म्हटलं होतं की पंतप्रधान मोदींना काहीजण चुकीची माहिती देतात. तुम्ही भेटत रहा, एक दिवस त्यांना ही गोष्ट समजेल.

सत्यपाल मलिक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात पंतप्रधान मोदी यांच्याशी जेव्हा जेव्हा चर्चा केली तेव्हा ते अंहकारी वाटले. त्यांनी अमित शहांची भेट घेण्यास सांगितल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला होता. दरम्यान, आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना मात्र सत्यपाल मलिक यांनी मोदी आणि शहा यांच्यातलं नातं खूप चांगलं असल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सत्यपाल मलिक यांचा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी विचारलं होतं की, पंतप्रधान मोदींबाबत मलिक यांनी केलेलं वक्तव्य खरं आहे का? मलिक हे हरयाणातील चरखी दादरीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यामध्ये मलिक म्हणतात की, कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी त्यांच्यामुळे मारले गेले हे मान्य करायला मोदी तयार नव्हते.

हेही वाचा: पंतप्रधान म्हणाले शेतकरी माझ्यासाठी मेले का : सत्यपाल मलिक

नेमकं काय म्हणाले होते मलिक?

दादरी येथील कार्यक्रमात बोलताना मलिक यांनी म्हटलं होतं की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मी पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी पाच मिनिटांतच माझं त्यांच्याशी भांडण सुरू झालं. मोदी खूप अंहकारात बोलत होते. या आंदोलनामध्ये पाचशे लोकांचा मृत्यू झाल्याचं त्यांना सांगितलं. यावर मोदींनी ते शेतकरी माझ्यासाठी मेले आहेत का? असं विचारलं. मी देखील त्यांना तुमच्यासाठीच ते मेले असल्याचे सांगितले.

Web Title: Governor Satyapal Malik Clarification On His Statement About Pm Modi And Amit Shah

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top