esakal | मुख्यमंत्री अशोक गेहलोत चौथ्यांदा राज्यपालांच्या भेटीला; काय घडलं? 
sakal

बोलून बातमी शोधा

Governor Sends Back Gehlots Proposal Demanding Assembly Session on July 31

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आज चौथ्यांदा राज्यपाल कलराज मिश्र यांच्या भेटीला गेले होते. परंतु, गेहलोत यांच्या ३१ जुलै रोजी अधिवेशन बोलविण्याच्या मागणीला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत चौथ्यांदा राज्यपालांच्या भेटीला; काय घडलं? 

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

जयपुर: राजस्थानमधील राजकीय वातावरण काही केल्या शांत होताना दिसत नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आज चौथ्यांदा राज्यपाल कलराज मिश्र यांच्या भेटीला गेले होते. परंतु, गेहलोत यांच्या ३१ जुलै रोजी अधिवेशन बोलविण्याच्या मागणीला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यपाल कलराज मिश्र यांनी तिसऱ्यांदा ही फाईल नाकारली असून एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार विधानसभेचे अधिवेश बोलविण्याची मागणी नाकारल्यानंतर काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात आहे. राजस्थान मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. बंड केलेल्या सचिन पायलट यांनी अद्यापही माघार घेतली नसून, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिवेशन बोलावण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशोक गेहलोत यांनी यासंदर्भात थेट राष्ट्रपतींची भेट घेण्याचा तसेच पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शनं करण्याचाही इशारा दिला होता.
-----------------
मॉडर्नाची लस अंतिम टप्प्यात; किती असेल एका डोसची किंमत?
----------------
लस निर्मितीच्या प्रयत्नांना वेग; 'या' कंपन्या आहेत आघाडीवर
-----------------

दरम्यान, या राजकीय संघर्षात विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन पायलट यांनी शुभेच्छा दिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. राजस्थान विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांच्या दिर्घायुष्यासाठी मी इश्वरचरणी प्रार्थना करतो. अशा आशयाचे ट्विट सचिन पायलट यांनी केले आहे.