Sugarcane FRP | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून उसाला ३०५ रुपये प्रतिक्विंटल एफआरपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

govt announces rs 305 quintal hike in sugarcane frp for fy23

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून उसाला ३०५ रुपये प्रतिक्विंटल एफआरपी

सरकारने साखर हंगाम २०२२-२३ साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांद्वारे देय असलेल्या उसाच्या एफआरपीला मान्यता दिली आहे. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक भाव ३०५ रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (CCEA) ही माहिती दिली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी उसाचा भाव ३०५ रुपये प्रतिक्विंटल (एफआरपी) निश्चित केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाची एफआरपी (Fair Remunerative Price) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

एफआरपी म्हणजे काय?

एफआरपी हा साखर कारखान्यांना शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करण्यासाठी लागणारा किमान दर आहे. सरकार ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ अंतर्गत एफआरपी निश्चित करते. एफआरपीमध्ये प्रति क्विंटल १५ रुपयांनी वाढ करण्याची कॅबिनेट नोट यापूर्वीच जारी करण्यात आली होती. यापूर्वी उसाचा भाव (एफआरपी) २९० रुपये प्रतिक्विंटल होता तो आता ३०५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. सरकारने गेल्या आठ वर्षांत एफआरपीमध्ये ३४ टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. याचा फायदा ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तसेच देशभरातील साखर कारखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या ५ लाख कामगारांना होणार आहे.

हेही वाचा: शिवसेना-शिंदे गटाचा वाद 'व्हॉट्सऍप लेव्हल'वर; नीलम गोऱ्हेंना ग्रुपमधून काढलं

ऊस गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत चालतो. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उसाच्या किमतीत वाढ करण्याबरोबरच केंद्राने अतिरिक्त १.२ दशलक्ष टन (MT) साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या चालू हंगामातील उत्पादनाने अंदाजे देशांतर्गत उत्पादन ओलांडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याबाबत शासनाच्या अधिसूचनेची अद्याप प्रतीक्षा आहे.

हेही वाचा: सामंतांवरील हल्ल्यानंतर शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढणार

Web Title: Govt Announces Rs 305 Quintal Hike In Sugarcane Frp For Fy23

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sugarcane