
पंधरा दिवसांत योजना सादर करा; केंद्राच्या स्विगी-झोमॅटोला सूचना
नवी दिल्ली : केंद्र सरकारने स्विगी आणि झोमॅटो (Swiggy Zomato) सारख्या कंपन्यांना ग्राहक तक्रार (Complaint) निवारण यंत्रणा सुधारण्यासाठी 15 दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. ग्राहक व्यवहार विभागाने आघाडीच्या ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) विद्यमान फ्रेमवर्क तसेच ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा सुधारण्यासाठी १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (Swiggy Zomato News )
हेही वाचा: झोमॅटोनंतर आता 'स्वीगी'चाही IPO येणार ?
ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख FBOs सोबत झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. या क्षेत्रातील ग्राहकांवर परिणाम करणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
गेल्या 12 महिन्यांत राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (1915) वर स्विगीसाठी 3,631 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. त्याचवेळी झोमॅटोबाबत 2,828 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, केंद्राच्या या आदशानंतर संबंधित कंपन्या कशा प्रकारच्या योजनांबाबत सादर करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Web Title: Govt Asks Swiggy Zomato And Others To Submit Plans In 15 Days
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..