Small Savings Schemes: खूशखबर! सुकन्या समृद्धी योजनेसह छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ

नवे व्याजदर एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहेत.
sukanya samruddhi yojana
sukanya samruddhi yojanagoogle

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या दिवशी सरकारनं छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना खूशखबर दिली आहे. सरकारनं छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये वाढ केली असून नवे व्याजदर एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहेत. (Govt Increase interest rate of small savings schemes including Sukanya Samriddhi Yojana Kisan Vikas Patra)

sukanya samruddhi yojana
Pune News: फुरसुंगी अन् उरुळी देवाची गावं अखेर महापालिकेतून वगळली; आता..

सरकारच्या माहितीनुसार, एप्रिल-जूनच्या तिमाहीत छोट्या बचत योजनांच्या व्याज दरात ७० बीपीएसपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ज्येष्ठ नागरिक बरच योजना, राष्ट्रीय बचत पत्रे, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मिळेल.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

कुठल्या योजनात किती वाढले व्याजदर?

  1. वरिष्ठ नागरिक बचत योजनेच्या (SCSS) व्याजदरात ८ टक्क्यांहून वाढून ८.२ टक्के करण्यात आली.

  2. राष्ट्रीय बचत पत्र (NSC) या योजनेतील व्याजदर ७ टक्क्यांहून वाढून ७.७ टक्के करण्यात आला आहे.

  3. सुकन्या समृद्धी योजनेतील (SSS) व्यादरात वाढ होऊ तो ७.६ टक्क्यांहून ८ टक्के झाला आहे.

  4. किसान विकास पत्रावरील (KVC) योजनेवरील व्याजदर ७.२ टक्क्यांहून (१२० महिने) वाढून ७.५ टक्के (११५ महिने) करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com