
भारत सरकारने सोमवारी मीडियाला एक एडव्हायजरी जारी करून ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मची जाहिरात करणे टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल आणि ऑनलाइन मीडियावर दिसणाऱ्या ऑनलाइन बेटिंग वेबसाइट्स/प्लॅटफॉर्मच्या अनेक जाहिरातींच्या उदाहरणानंतर हा सल्ला देण्यात आला आहे. (Govt issues advisory against ads promoting online betting)
सट्टेबाजी आणि जुगार, देशाच्या बहुतेक भागांमध्ये बेकायदेशीर आणि ग्राहकांसाठी, विशेषत: तरुण आणि लहान मुलांसाठी धोकादायक आहे, असे सरकारने म्हटले आहे. ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातींमुळे बंदी असलेल्या बाबींचा प्रचार होत आहे, असेही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मंत्रालयाने ऑनलाइन जाहिरातीसह ऑनलाइन आणि सोशल मीडियाला अशा जाहिराती भारतात प्रदर्शित करू नयेत किंवा भारतीय प्रेक्षकांना अशा जाहिरातींसाठी लक्ष्य करू नये असा सल्ला दिला आहे.
4 डिसेंबर 2020 रोजी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने खाजगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्ससाठी ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींबाबत जाहिरात मानक परिषद (ASCI) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, यासाठी एक एडव्हायजरी जारी केली होती. ज्यात ऑनलाइन गेमिंगच्या प्रिंट आणि ऑडिओ व्हिज्युअल जाहिरातीमध्ये काय असावे आणि काय नसावे याबद्दल माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.