भारत आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेची 300 मिलियन डॉलरच्या कर्जावर स्वाक्षरी | India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nirmala sitaraman

या अंतर्गत शहरी भागात प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्यात येणार आहेत. देशातील १३ राज्यांना यामुळे फायदा होईल.

भारत आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेची 300 मिलियन डॉलरच्या कर्जावर स्वाक्षरी

भारत सरकार आणि आशियाई विकास बँकेने ३०० मिलियन डॉलर्सच्या कर्जावर स्वाक्षरी केली आहे. या अंतर्गत शहरी भागात प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्यात येणार आहेत. देशातील १३ राज्यांना यामुळे फायदा होईल. देशात १३ राज्यांमध्ये शहरी भागात प्राथमिक आरोग्य सुधारणा करण्यात येणार आहेत.

शहरी भागातील जवळपास २५६ मिलियन नागरिकांना यामुळे लाभ मिळणार आहे. तसंच यामध्ये शहरात असलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांनाही फायदा होणार आहे. २६५ मिलियनपैकी झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्या ५१ मिलियन इतकी असल्याचंही देशाच्या अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे.

loading image
go to top