मोठी बातमी : काश्मीरमधून सात हजार जवान माघारी बोलविण्याचा निर्णय

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

जम्मू आणि काश्‍मीरमधून निमलष्करी दलाच्या सात हजार तुकड्यांना माघारी बोलविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने आज घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काश्‍मीर खोऱ्यातील सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्‍मीरमधून निमलष्करी दलाच्या सात हजार तुकड्यांना माघारी बोलविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने आज घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काश्‍मीर खोऱ्यातील सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काश्‍मीर खोऱ्यात सध्या तैनात असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या 72 कंपन्यांना माघारी बोलविण्यात आल्या आहे. प्रत्येक कंपनीमध्ये 100 जवानांचा समावेश असतो. काश्‍मीरबाबतचे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला सुमारे 20 कंपन्या काश्‍मीरमधून माघारी बोलविण्यात आल्या होत्या.

या टिकटॉक गर्लनं लावलं जगाला वेड

कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या वेळेस तेथे स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन, तेथे गृहमंत्रालयाने निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात केल्या होत्या. आता हळू हळू या तुकड्या मागे घेण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. जवळपास 7 हजारहून अधिक जवान आता मागे घेण्यात येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt Orders Withdrawal of Over 7000 Paramilitary Soldiers from Kashmir Valley