'कोरोना झालेल्यांना 9 महिन्यांनी लस द्यावी'

corona vaccination
corona vaccinationcorona vaccination

coronavirus vaccine, NTAGI नवी दिल्ली : कोरोनावर (Covid-19) मात केलेल्यांना नऊ महिन्यांनंतर कोरोनाची लस देण्यात यावी, असा सल्ला ‘ॲडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन पॅनेल’ने (NTAGI) दिला आहे.‘एनटीएजीआय’ने यापूर्वीच ‘कोव्हिशिल्ड’च्या दोन डोसांमधील (Vaccination) अंतर वाढवण्यास सांगितले आहे. आधी या दोन डोसांमधील अंतर चार ते आठ आठवडे होते.

तज्ज्ञ मंडळींचा समावेश असणाऱ्या या पॅनेलने दोन डोसांमधील अंतर किती असावे यासंदर्भात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती तपासून पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा संसर्ग होऊ नये म्हणून दोन डोसमधील अंतर वाढवण्यात यावे असे म्हटले होते. तज्ज्ञ समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार संसर्ग झाल्यानंतर आणि पहिला डोस घेण्यामध्ये अधिक अंतर असेल तर शरीरामध्ये अँटिबॉडिज तयार होण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी फायदा होईल. (Govt Panel Suggests Extending Vaccination Gap After Covid Infection to 9 Months)

corona vaccination
माणूसकी हरवली? मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापानं शोधली वाट

लसीकरणाच्या (Vaccination) प्रारंभीच्या काळात दुसऱ्या डोससाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविशिल्ड (Covishield ) लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 4 ते 6 आठवड्यात घेण्याचा सल्ला याआधी देण्यात आला होता. त्यामध्ये पुन्हा वाढ करून नंतर तो 4 ते 8 आठवड्यांचा करण्यात आला. एप्रिल महिन्यात केंद्राने परत त्यामध्ये बदल करून दुसरा डोस 6 ते 8 आठवड्यात घेतल्यास त्याची परिणामकारकता अधिक असल्याचे स्पष्ट केले. मागील तीन-चार दिवसात कोविशिल्डचा दुसरा डोस 4 ते 6 आठवड्यांऐवजी थेट 12 ते 16 आठवड्यात घ्यावा, अशी शिफारस नॅशनल टेक्‍निकल ऍडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (NTAGI ) केंद्राला शिफारस केली आहे. ही शिफारस करताना एनटीएजीआयने ब्रिटन, स्पेनसारख्या प्रगत देशांचे उदाहरण दिले आहे. ही शिफारस केंद्राने स्वीकारली असून त्यानुसार कोविन ऍपमध्ये बदल केले आहेत. सहा आठवड्यानी दुसरा डोस घेतल्यास त्याची परिणामकारकता 55.1 टक्के तर 12 आठवड्यांनी घेतल्यास ती 81.3 टक्के असल्याचा दावा एनटीएजीआयने केला आहे.

corona vaccination
दुसरा डोस कधी घ्यायचा? दोन डोसमधील अंतर वाढत असल्याने संभ्रम

ब्रिटनमध्ये दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांचे करण्यात आले होते. मात्र, भारतात कोरोना विषाणूचा सामान्य असलेल्या पेक्षा वेगळा प्रकार आढळल्याचा दावा ब्रिटनने केला होता. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दोन डोसमधील अंतराचा कालावधी पुन्हा कमी करून 8 आठवड्यांचा करीत असल्याचे दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. भारतात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याचा ब्रिटनचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खोडून काढला असला तरी दोन डोसमधील अंतर भारतात पुन्हा कमी होणार का? हा खरा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com