esakal | केंद्र सरकारचा मोठा दिलासा, 39 गोळ्यांचं दर केले कमी
sakal

बोलून बातमी शोधा

pills.jpg

केंद्र सरकारचा मोठा दिलासा, 39 गोळ्यांचं दर केले कमी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

कर्करोग (कॅन्सर), मधुमेह आणि टीबी सारख्या रुग्णांसाठी दररोज वापरात येणाऱ्या विविध 39 गोळंचे दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एनएलइएमच्या (National List of Essential Medicines) या संशोधाननंतर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे कोरोना रुग्णावरील उपचार आणखी सोपा होणार आहे. कर्करोग विरोधी (anti-cancer), मधुमेह विरोधी (anti-diabetes), अँटीव्हायरल (antiviral), बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या गोळ्या ( antibacterial) आणि टीबी विरोधी ( anti-TB drugs) या गोळ्यांसह इतर 39 गोळ्यांचा समावेश आहे. या सर्व गोळ्या कोरोना उपचारामध्ये वापरल्या जातात.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) मागील काही दिवसांपासून गोळ्यांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. एनएलइएमच्या सूचीवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी 16odd गोळ्या हटवल्या आहेत. सामान्यतः नेहमी वापरली जाणारी गोळ्या-औषधांच्या किंमती नियंत्रणात अथवा घटवण्यात आल्या आहे. यामध्ये मधुमेह विरोधी Teneligliptin आणि प्रसिद्ध टीबी विरोधी गोळ्यांचाही समावेश आहे. त्याशिवाय कोरोना उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या Ivermectin आणि Rotavirus vaccine यांचाही समावेश आहे.

हेही वाचा: Paralympic : भारताचे सुवर्णस्वप्न भंगलं, सुहास यथिराजला रौप्य

केंद्र सरकारने आवश्यक औषधांची राष्ट्रीय यादी तयार करण्याचं काम 2015 मध्ये सुरु करण्यात आलं होतं. स्थायी राष्ट्रीय समितीवर हे काम सोपवलं होतं. 2016 पासून यावर प्रत्यक्षात काम सुरु झालं होतं. यामध्ये कोणती औषधे पुरेशा संख्येने आणि विहित प्रमाणात उपलब्ध असावीत, हे मुख्य काम होतं. त्यानुसार मागील 4 वर्षांपासून गोळ्यांचं दर नियंत्रणात आणण्याचं काम सुरु आहे.

loading image
go to top