esakal | कोरोना लढ्यात पुढील शंभर दिवस महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेबद्दल सरकारचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

पुढील शंभर दिवस महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेबद्दल सरकारचा इशारा

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशातील कोरोना प्रकरणांमध्ये घट कमी आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी इशारा दिला आहे. सरकारने म्हटलंय की, पुढील तीन ते चार महिने कोरोना विरोधातील लढ्यासाठी महत्त्वाचे आहेत. आज आरोग्य मंत्रलयाच्या पत्रकार परिषदेत जॉइंट सेक्रेटरी (आरोग्य) लव अग्रवाल यांनी म्हटलंय की, कोरोनाची तिसरी लाट ही लोकांच्या वागण्यावर आणि लशीकरणाच्या गतीवर अवलंबून आहे. भारतात एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. या काळात आरोग्य यंत्रणा अपुरी पडल्याचं चित्र दिसून आलं होतं. तज्ज्ञांनी आता ऑगस्ट वा ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या नव्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक असल्याचंही सांगण्यात आलंय.

हेही वाचा: शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मोफत रक्त; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

दुसऱ्या लाटेदरम्यान देशांतील बहुतांश राज्यात कडक लॉकडाऊन लावावा लागला होता. मात्र, जसजसे रुग्ण कमी होत गेले आणि परिस्थिती थोडी आटोक्यात येत गेली तसतसे हे निर्बंध कमी करण्यात आले. मात्र, लव अग्रवाल यांनी म्हटलं की, निर्बंध कमी केल्यानंतर लोकांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या नियमांमध्ये ढिलाई केल्याचं चित्र आहे. आपल्याला मास्कचा वापर हा 'न्यू नॉर्मल'प्रमाणे केला पाहिजे. दुसऱ्या लाटेच्या दरम्यान मास्कचा वापर मार्च-एप्रिल महिन्यात वाढला मात्र, त्यानंतर जून-जुलै दरम्यान तो पुन्हा घसरत गेला, अशीही माहिती त्यांनी दिली. आकडेवारीच्या अंदाजानुसार, मास्कचा हा वापर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांपर्यंत घसरत जाईल. अनेक लोक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जात असल्याचं देखील चित्र आहे. पंतप्रधानांनी तसेच आरोग्य मंत्रालयाने देखील याबाबत वारंवार सुचना दिल्या आहे.

loading image