काश्मीर : टार्गेट किलींगनंतर हिंदू कर्मचार्‍यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Jammu and Kashmir
Jammu and Kashmir sakal

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत हिंदू समाजाच्या टार्गेट किलिंगची प्रकरणे समोर आल्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता काश्मीर खोऱ्यात काम करणाऱ्या हिंदू समाजातील सर्व सरकारी कर्मचार्‍यांना जिल्हा मुख्यालयातच तैनात केले जाईल. (Govt to transfer Hindu employees in Kashmir to district headquarters to ensure security)

मंगळवारीही कुलगाममध्ये हिंदू महिला शिक्षिका रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. गेल्या 5 महिन्यांतील ही 16वी टार्गेट किलिंगची घटना होती. दरम्यान यानंतर प्रशासनाचा हा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण सुरक्षित ठिकाणीच पोस्टिंग मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत होती. गेल्या महिन्यात बडगनच्या दुर्गम भागातील चांदुरा येथील तहसील आवारात घुसून राहुल भट यांचीही हत्या करण्यात आली होती.

6 जूनपर्यंत होणार बदली

राहुल भट यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला होता की, त्याची जिल्हा मुख्यालयात नियुक्ती झाली असती तर आज तो जिवंत असता. बुधवारी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कर्मचाऱ्यांना 6 जूनपर्यंत सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्यात येणार आहे. काश्मीरमधील दुर्गम भागात जेथे सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे, तेथे हिंदू, शीख किंवा अल्पसंख्याक समुदायातील कोणत्याही कर्मचाऱ्याला पोस्टिंग दिले जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कर्मचाऱ्यांना 6 जूनपर्यंत सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्यात येणार आहे. काश्मीरमधील दुर्गम भागात जेथे सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे, तेथे हिंदू, शीख किंवा अल्पसंख्याक समुदायातील कोणत्याही कर्मचाऱ्याला पोस्टिंग दिले जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. एवढेच नाही तर या कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर वेळीच सुनावणी व्हावी यासाठी ईमेल आयडी तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या बैठकीत सर्व विभागातील खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील चिंता दूर करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यांनी काही तक्रार केल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी.

Jammu and Kashmir
शरद पवारांवरील टीका पडली महागात, गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

एवढेच नाही तर अशा तक्रारींबाबत जर कोणी अधिकारी हलगर्जीपणा करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे उपराज्यपालांनी बैठकीत सांगितले. कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना सुरक्षित वाटेल, असे वातावरण कसे निर्माण करता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाली. वरिष्ठ अधिकारी अशा कर्मचाऱ्यांची भेट घेणार आहेत. असुरक्षित वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची थेट उपायुक्त आणि एसपी स्तरावरील अधिकाऱ्यांकडून सोडवणूक केली जाईल. विशेष म्हणजे राहुल भट यांच्या हत्येनंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्यात यावे, अशी हिंदू समाजातील कर्मचाऱ्यांची मागणी जोर धरू लागली होती. त्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jammu and Kashmir
अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणी राज्य सरकारला केंद्राचे पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com