नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

कानपूरमध्ये २०१६ मध्ये ही घटना घडली होती. असे गुन्हे गंभीर आणि घृणास्पद आहेत. गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी जणेकरुन समाजातील कोणीही पुन्हा असा गुन्हा करणार नाही. यांना कडक शिक्षा झाल्यास समाजात योग्य संदेश जाईल.
Finally 25 years imprisonment for 4 gang rape criminals up kanpur
Finally 25 years imprisonment for 4 gang rape criminals up kanpur esakal

उत्तर प्रदेशातील कानपूर कोर्टाने एका विद्यार्थीनीसोबत झालेल्या सामुहीक बलात्कार प्रकरणात निकाल दिला आहे. चार आरोपींना कोर्टानाने 25-25 वर्षाची शिक्षा सुनावणी आहे. याशिवाय 52-52 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच पीडितेला 2,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले. कानपूरचे अतिरिक्त विशेष न्यायाधीश योगेश कुमार यांनी हा निर्णय दिला आहे.

असे गुन्हे गंभीर आणि घृणास्पद आहेत. गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी जणेकरुन समाजातील कोणीही पुन्हा असा गुन्हा करणार नाही. यांना कडक शिक्षा झाल्यास समाजात योग्य संदेश जाईल. कारण सामूहिक बलात्कार सारखा गुन्हा पीडितेला पूर्ण उद्धवस्त करतो. तिचे कुटुंब देखील दहशतीच्या वातावरणात जगते, असे सुनावणी दरम्यान सरकारी वकील भावना गुप्ता यांनी सांगितले. (Crime news in marathi)

2016 मध्ये  इयत्ता 9 वीत शिकणारी विद्यार्थीनी सायकलवरुन शाळेत गेली होती. मात्र दुपारी एक वाजता ती रडत घरी आले. तिने तिच्या आजोबांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिला अंकित नावाच्या आरोपीने बाहेर जाण्याच्या बहाण्याने कल्याणपूर रेल्वे स्टेशनवर घेऊन नेले. तिथे तो जितेंद्रला भेटला. स्टेशन स्टँडवर सायकल उभी केल्यानंतर दोघांनी तिला खासगी बसने परिसरातील एका शाळेत नेले. दोन आरोपींचे दोन मित्र करण आणि विशालही येथे आले. सर्वांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Finally 25 years imprisonment for 4 gang rape criminals up kanpur
PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

सामूहिक बलात्कार  बलात्कारानंतर तिला मारहाण देखील करण्यात आली. आरोपीने धमकावत याबाबत कोणाला सांगू नकोस, असे सांगितले. पीडित मुलीच्या आजोबांनी पाणकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. 

तक्रारदाराच्या वतीने 10 साक्षीदार न्यायालयात हजर झाले. पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने चार आरोपींना दोषी मानून हा निकाल दिला आहे. आजोबांनी ८ वर्ष आपल्या नातीसाठी लढा दिला. कोर्टाने नराधमांना शिक्षा सुनावली.

Finally 25 years imprisonment for 4 gang rape criminals up kanpur
PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com