cpr given by up police
sakal
बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते रस्त्यावर कोसळले. यावेळी रहीमनगर पोलीस चौकीत तैनात असलेले पोलीस शिपाई संदीप यादव यांनी प्रसंगावधान राखत त्यांना तातडीने सीपीआर (CPR) दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे वृद्धाची प्रकृती सुधारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संदीप यादव यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.