

एका वृद्धाने आपल्या नातवाच्या चितेवर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. वृद्धाच्या नातवाने पत्नीची हत्या केल्यानंतर जीवन संपविले होते. ही घटना मध्य प्रदेशातील सिद्धी जिल्ह्यात बहरी पोलिस स्टेशन परिसरातील सिहोलिया गावात घडली.