
एका अल्पवयीन मुलावर वयाच्या १६ व्या वर्षी अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर बाल हक्क न्याय मंडळात खटला चालवण्यात आला. १३ वर्षांपूर्वी या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. आता त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. तब्बल २३ वर्षे हा खटला चालला. इतक्या वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने बेनिफिट ऑफ डाऊट देत त्याची निर्दोष सुटका केलीय. ग्रेटर नोएडातील गौतमबुद्धनगर जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिलाय.