अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू; ३० जून ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Green flag for Amarnath Yatra

अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू; ३० जून ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार

भगवान शंकराच्या अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra) तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी बाबा अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरू होणार असून, ४३ दिवस चालणार आहे. परंपरेनुसार ही यात्रा ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नर ऑफिसच्या वतीने ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. यात्रा पुन्हा सुरू झाल्याने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Green flag for Amarnath Yatra)

दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे (coronavirus) अमरनाथ यात्रा थांबली होती. मात्र, या काळात पवित्र गुहेत बाबा अमरनाथ यांची पूजा पारंपरिक पद्धतीने वैदिक मंत्रोच्चाराने सुरू राहिली. सोबतच मचैल माता यात्राही मागे घेण्यात आली. जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या वतीने किश्तवाडचे उपायुक्त अशोक कुमार शर्मा यांनी मचैल यात्रा रद्द केल्याची घोषणा केली.

हेही वाचा: Imran Khan : कॅबिनेट मंत्री शाहजहान बुगती यांनी दिला राजीनामा

आता देशात कोरोनाची (coronavirus) प्रकरणे कमी झाल्याने अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने रविवारी या यात्रेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. रविवारी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाची बैठक झाली. ज्यामध्ये पुन्हा यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे श्री अमरनाथ (Amarnath Yatra) गुहा काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग जिल्ह्यात आहे. हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की भगवान शिव यांनी या गुहेत माता पार्वतीला अमरत्वाची रहस्यकथा सांगितली होती.

अमरनाथ यात्रेचा (Amarnath Yatra) प्रवास देशातील सर्वांत दुर्गम धार्मिक प्रवासांपैकी एक मानला जातो. श्री अमरनाथ यात्रेदरम्यान दोन मार्गांनी चढाई केली जाते. ज्यामध्ये पहिला मार्ग पहलगाम आणि दुसरा बालटाल मार्गे जातो. या यात्रेवर दहशतवादी आणि फुटीरतावादी लक्ष ठेवून असतात. त्यामुळे यात्रेच्यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते.

हेही वाचा: निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी; भाजपचे खोटे उघड करण्यासाठी घेतला हा निर्णय

भाविकांना घेता येणार बाबा बर्फानीचे दर्शन

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या बैठकीनंतर यात्रेची तारीख निश्चित करण्यात आली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून विशेष दर्जा काढून घेण्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशात समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अमरनाथ यात्रा मध्यभागीच रद्द करावी लागली होती.

२ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया

ज्या भक्तांना श्री अमरनाथजीचे दर्शन घ्यायचे आहे त्यांना स्वतःची नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी प्रक्रिया २ एप्रिलपासून सुरू होणार आहे. मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका दिवसात केवळ २० हजार लोकांची नोंदणी होणार आहे. याशिवाय तुम्ही प्रवासाच्या दिवशी काउंटरवर जाऊनही नोंदणी करू शकता, असे श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने म्हटले आहे. बाबा अमरनाथच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लाखो लोक येतात, हे विशेष...