Education News : सतरा राज्यांत ५७ नवी केंद्रीय विद्यालये, केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील; काझिरंगात उन्नत मार्ग बांधणार
New Schools India : केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ राज्यांतील ५७ नव्या केंद्रीय विद्यालयांना मंजुरी दिली असून यामुळे ८७ हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अल्पखर्ची शिक्षणाची संधी मिळणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ राज्यांमध्ये ५७ नवी केंद्रीय विद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाला आज हिरवा कंदील दाखवला. यातील सात विद्यालये ही गृहमंत्रालयातर्फे तर ५० विद्यालये राज्य सरकार पुरस्कृत करण्यात येणार आहेत.