काश्मीरमध्ये पोलिसांच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला; दहशतवाद्यांनी केलं टार्गेट

टीम ई सकाळ
Friday, 22 January 2021

जम्मू काश्मीरमधील किश्तवाड इथं दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केल्याची घटना घडली आहे.

किश्तवाड - जम्मू काश्मीरमधील किश्तवाड इथं दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यानंतर परिसराला घेराव घालण्यात आला असून शोधमोहिम सुरू आहे. सुरक्षा दलाच्या गाड्यांची वाहतूकसुद्धा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. 

किश्तवाड जिल्हा मुख्यालयापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या डेडपेथ भागात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. पोलिसांनी वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. किश्तवाडच्या एसएसपी याचा आढावा घेत आहेत. 
भारत भारत भारत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grenade lobbed at Police vehicle in Kishtwar

Tags
टॉपिकस
Topic Tags: