esakal | पोलिस म्हणाले; लग्न करायचे का मग ये बाजूला...

बोलून बातमी शोधा

groom come with family police call bride and did marriage on checkpost at uttarakhand

देशात कोरोना व्हायरसमुळे 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून, अनेकजण विविध ठिकाणी अडकलेले दिसतात. मात्र, एका लग्नाची गोष्ट चर्चेत आली आहे. कारण पोलिसांनी दोघांचा विवाह चक्क तपासणी नाक्यावर लावून दिला.

पोलिस म्हणाले; लग्न करायचे का मग ये बाजूला...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसमुळे 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून, अनेकजण विविध ठिकाणी अडकलेले दिसतात. मात्र, एका लग्नाची गोष्ट चर्चेत आली आहे. कारण पोलिसांनी दोघांचा विवाह चक्क तपासणी नाक्यावर लावून दिला. उत्तराखंडमधील काशीपूर येथे ही घटना घडली आहे.

गूड न्यूज! अवघ्या 5 सेकंदात होणार कोरोनाचे निदान...

थाना मूंडापाडे येथील विक्रम सिंग याचा बरखेडा पांडे येथील युवतीसोबत विवाह ठरला होता. विवाहासाठी रविवारी (ता. 26) तो बहिणीला सोबत घेऊन काशीपूरकडे निघाला होता. विवाहासाठी त्याने परवानगी घेतली होती. पण, पैगा चौकीवर पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी थांबवले. यावेळी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने लग्न करण्यासाठी आल्याचे सांगितले. पण, युवतीच्या कुटुंबियांनी परवानगी घेतली नव्हती. पोलिसांनी यावर तोडगा काढला. युवतीला तपासणी नाक्यावर बोलावले आणि सोशल डिस्टन्सिंगच पालन करत दोघांचा विवाह लावून दिला. यावेळी फक्त पाच जण उपस्थित होते. विवाहानंतर नवरी नवरदेवासोबत सासरी गेली.

नवरा म्हणाला; सायकलवर फक्त व्यवस्थित बस...

दरम्यान, दोघांचा विवाह तपासणी नाक्यावर झाल्याची चर्चा परिसरात रंगली असून, नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांसह पोलिसांना शुभेच्छा दिल्या आहेत.