esakal | गूड न्यूज! अवघ्या 5 सेकंदात होणार कोरोनाचे निदान...
sakal

बोलून बातमी शोधा

iit professor develops software to detect covid 19 in 5 seconds using x ray scan of suspected patient

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना एक चांगली बातमी पुढे येत आहे. संशयित रुग्णाचे एक्स-रे स्कॅन पाहून केवळ पाच सेकंदात कोरोनाचे निदान करता येईल, असा दावा आयआयटी रुरकीच्या प्राध्यापकाने केला आहे.

गूड न्यूज! अवघ्या 5 सेकंदात होणार कोरोनाचे निदान...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना एक चांगली बातमी पुढे येत आहे. संशयित रुग्णाचे एक्स-रे स्कॅन पाहून केवळ पाच सेकंदात कोरोनाचे निदान करता येईल, असा दावा आयआयटी रुरकीच्या प्राध्यापकाने केला आहे.

गुड न्यूज : देशातील 'ही' तीन राज्ये कोरोनामुक्त...

कमल जैन असे या प्राध्यापकाचे नाव असून, ते सिव्हिल इंजिनियरिंग विभागात शिकावतात. त्यांनी 40 दिवसांच्या संशोधनानंतर हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरच्या पेटंटसाठी त्यांनी दावा केला आहे. शिवाय, या सॉफ्टवेअरच्या चाचणीसाठी त्यांनी आयसीएमआरकडे धाव घेतली आहे. दरम्यान, सॉफ्टवेअरची अद्याप पडताळणी झालेली नाही.

1921 नंबरच्या कॉलवरून विचारले जाणार पुढील प्रश्न...

या सॉफ्टवेअरविषयी माहिती देताना कमल जैन यांनी सांगितले की, सुमारे 60 हजार एक्स-रे स्कॅनची पडताळणी करवून मी आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित डाटाबेस तयार केला. त्यातून कोविड-19, न्यूमोनिया आणि क्षयरोगाच्या रुग्णांच्या छातीमधील फरकाचा अभ्यास केला. तसेच मी अमेरिकेतील एनआयएच क्लिनिकल सेंटरमधील रुग्णांच्या छातीच्या एक्स-रेंची पडताळणी केली. या सॉफ्टवेअरमध्ये डॉक्टरांनी कुठल्याही रुग्णाच्या एक्स-रेचे छायाचित्र अपलोड केल्यानंतर हे सॉफ्टवेअर संबंधित रुग्णामध्ये न्यूमोनियाची लक्षणे आहेत का हे दाखवेल. शिवाय, ही लक्षणे कोविडमुळे आहेत की अन्य काही कारणांमुळे आहेत याचे अनुमान लावेल ही सर्व प्रक्रिया केवळ 5 सेकंदात पूर्ण होईल. विशेष म्हणजे ही चाचणी कमी खर्चिक ठरू शकते.'

गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...

दरम्यान, अमेरिकेतील अमेझॉन विद्यापीठात अशाच प्रकारचे संशोधन सुरू आहे. मात्र, त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. कोरोनावर उपाय शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे.